रश्मी शुक्लांची विजयस्तंभासह वढू बुद्रुकला भेटएक जानेवारी कार्यकमाच्या नियोजनाचा घेतला आढावाशिरूर

9 Star News
0
रश्मी शुक्लांची विजयस्तंभासह वढू बुद्रुकला भेट
एक जानेवारी कार्यकमाच्या नियोजनाचा घेतला आढावा
शिरूर 
( प्रतिनिधी ) एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी पूर्ण होत असताना सदर कार्यकम स्थळी भेट देत प्रशासनाने केलेल्या नियोजनाची पाहणी करत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विजयस्तंभ सह वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट देत आढावा घेतला आहे.
                       कोरेगाव भीमा ता. शिरुर सह पेरणे येथील ऐतिहासिक विजयस्तंभ तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी भेट दिली, यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस हवालदार संदीप कारंडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अनिल जगताप कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, भूषण गायकवाड, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, पांडुरंग गायकवाड यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विजयस्तंभ तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीची पाहणी करत येथे समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन तसेच पार्किंग आणि पोलीस बंदोबस्तची माहिती घेतली, दरम्यान पोलीस प्रशासनाल योग्य सूचना देखील राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहे.
फोटो खालील ओळ – कोरेगाव भीमा विजयस्तंभ सह वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड समाधीस्थळी भेट देताना रश्मी शुक्ला व आदी.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!