पिंपळसूटी ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यातील मृत रक्षाचे पालकांना वनविभागाकडून दहा लाखाची मदत

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
           पिंपळसूटी ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यातील मृत रक्षा चे पालकांना वनविभागाकडून रुपये दहा लाखाचा मदतीचा धनादेश सूपूर्त कऱण्यात आला आहे.
         दिनांक २४ डिसेंबर रोजी पिंपळसुटी ता.शिरूर गावातील घोडनदीकडील कडेला रहात असणारे अजय निकम यांची मुलगी रक्षा अजय निकम वय- 4 वर्ष ही सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घराच्या पुढील अंगणात खेळत असताना लगत असलेल्या विलायती बाभूळीच्या भागात बसलेल्या बिबट्याने सावज समजून तिच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला होता.
  शिरूर वन विभागाच्या वतीने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभाग जुन्नर चे बचाव पथकाने शोधकार्य केले असून दोन दिवसापासून बिबट हुलकावणी देत आहे.. सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याची कार्यवाही केली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 
       जुन्नरचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी वन खात्याच्या वतीने तातडीची मदत म्हणून रक्षा हीचे पालकांना तातडीची मदत म्हणून रुपये दहा लाखाचा धनादेश आज जुन्नर वनविभागाचे सहायक वन वनसंरक्षक अमृत शिंदे , शिरूरचे प्रभारी वन परीक्षेत्र अधिकारी शिरूर संतोष कंक, प्रदीप चव्हाण , सरपंच सुनील फलके, पोलीस पाटील श्रीम वर्षा काळे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब खळदकर, माजी उपसरपंच शशिकांत वेताळ माजी उपसरपंच, ग्रामस्थ, फकीरभाई शेख, अशोक फराटे,ऋषिकांत फराटे,दशरथ फलके यांचे उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.
      
भीमा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची असलेली मोठी संख्या हे लक्षात घेता, शेतातील व लगतच्या घराभोवती वन विभागाच्या योजनेतील सौर कुंपण करून घेणे, प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, उघड्यावर शौचाला न जाणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सुचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे* असे कळकळीचे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!