शिरुर तालुक्यात पती आणि पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या असुन पतीने पत्नीला सांभाळण्यासाठी नकार दिल्याने सासरकडच्या मंडळींनी जावयासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. तर जावयाने पत्नीसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये पती व पत्नीने यांनी एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
पत्नी शितल भाउसो माने (वय २८ रा.लोखंडे वस्ती, रांजणगाव सांडस ता. शिरूर, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाउसो नाना माने, नाना आप्पा माने, शोभा नाना माने, दिर सचिन नाना माने (सर्व रा रा. राजगाव सांडस, लोखंडे वस्ती ता. शिरूर जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती भाऊसो नाना माने (वय ३४) रा.लोखंडे वस्ती, रांजणगाव सांडस ता. शिरुर, जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदिप भागचंद कन्हे, वाल्मीक भांगचंद कन्हे, सुभाबाई भागचंद कन्हे (तिघे रा. रामलिंग कन्हेवाडा ता. शिरुर, जि.पुणे), शितल भाऊसाहेब माने( रा. राजगाव सांडस, लोखंडे वस्ती ता. शिरुर जि.पुणे), जाई संतोष इंगळे, अनुसया नामदेव इंगळे (रा. दहिवडी ता. शिरुर जि.पुणे)यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी शितल माने यांच्या फिर्यादीनुसार पती व त्याचे नातेवाईक यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास रांजणगाव सांडस गावच्या हद्दीतील लोखंडे पेट्रोल पंपाच्या नजीक असलेल्या मनेरमबाबा ओढयाच्या पुलाच्या जवळ फिर्यादी तसेच त्यांचे भाऊ वाल्मीक, संदीप, बहीण जाई, मावशी अनुसया हे सर्वजण सासर कडील लोकांना शितल यांना घराबाहेर का काढले असे जाब विचारल्याने फिर्यादीचे पती भाऊसाहेब यांनी लोखंडी गजाने शितल यांचे भाऊ वाल्मीक यास मारहान करुन दुखापत केली. तर सासरे नाना माने, शोभा माने, सचिन माने यांनी फिर्यादी च्या सर्व नातेवाईकांना हाताने व लाथा बुक्याने मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली असल्यामुळे शितल यांनी वरील सर्वांच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
तसेच पती भाऊसो माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास रांजणगाव सांडस गावच्या हद्दीत लोखंडे पेट्रोल पंपानजीक असलेल्या मनेरमबाबा ओढयाच्या पुलाजवळ भाऊसो यांच्या पत्नी शितल यांचे नातेवाईक संदिप कन्हे, वाल्मीक कन्हे, सुभाबाई कन्हे, शितल माने, जाई इंगळे, अनुसया इंगळे हे सर्वजण स्विप्ट कार मध्ये आले फिर्यादी भाऊसो हे पत्नी शितल हिस व्यवस्थित सांभळत नाहीत आणि त्यांनी दुसरे लग्न केले आहे या कारणावरुन चिडून जाऊन संदीप कन्हे याने हातामध्ये लोखंडी गज घेऊन भाऊसो यांच्या कपाळावर व पाठीमध्ये मारत दुखापत केली. तर वाल्मीक कन्हे याने भाऊसो यांच्या तोंडावर हाताने फाईट मारत नाकावर जखम केली. तसेच इतर सर्व भाऊसो यांना तसेच त्यांचे आई-वडील भाऊ यांना मारहाण केली असल्याने भाऊसो माने यांनी वरील सर्वांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असुन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी बनकर हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत