शिरूर भीमाशंकर महामार्गावर शिरूर आनंद सोसायटी जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारच्या हलगर्जीपणा आणी बेजबाबदारपणामुुळे होता येत अपघातb नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गंभीर दखल न घेतल्यास सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.शिरूर पाबळ रस्ता राज्यमार्ग १०३ पाबळफाटा शिरूर ते मोतीनाला शिरूर या लांबीमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे गंभीर अपघात घडत आहेत
संबंधित रस्त्यावर आज दिनांक 21 डिसेंबर 2024 सायंकाळच्या दरम्यान खडीकरणावरती पसरवलेल्या मुरमावर पाणी मारणे आवश्यक असते प्रमाणापेक्षा जास्त पाणी मारल्यामुळे व हे काम संध्याकाळच्या दरम्यान केल्याने रस्त्यावर चिखल तयार झाला त्यावरून अनेक अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात झाले काहींना गंभीर इजा झाल्या ठेकेदाराच्या व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या र्बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला सार्वजनिक बांधकाम विभागाचेही कटाक्षाने लक्ष नसल्याचे दिसून आले जर असते तर ठेकेदार बेजबाबदारपणे वागला असता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तेथील काही भगिनींनी संबंधित हलगर्जीपणा बाबत आणि बेजबाबदारपणा बाबत प्रचंड नाराजी व तीव्र संताप व्यक्त करत तसेच सदर काम हे निकृष्ट होत असल्याचे तसेच मुरमापेक्षा माती जास्त असल्याचाही आरोप केले आहे, याबाबत शिरूर विभागाचे सहाय्यक अभियंता श्री अनील जाधव यांना कळवले असुन, संबंधित प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण यांच्याकडेही सदर बाब कळवलेली आहे आता संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करते ते पाहणे आवश्यक आहे परंतु नागरिकांच्या जीवाशी असा खेळ खेळणे हे अत्यंत संतापजनक असून प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारावरती गुन्हे दाखल करणे व योग्य ती पुढील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे..
"सहाय्यक अभियंता यांच्या सूचनेनंतर कनिष्ठ अभियंता गाडेकर हे काही वेळात उपस्थित झाले परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अनेकदा फोन केल्यानंतरही ठेकेदार किंवा ठेकेदाराचे कर्मचारी वेळेत आले नाहीत अधिकारी मात्र बराचवेळ ताटकळत होते यावरून समजते की ठेकेदारास नागरिकांच्या किती काळजी आहे, असे ठेकेदार प्रशासनाला दाद देत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतो"
चौकट:- संबंधित काम होण्यासाठी संबंधित प्रशासनातील तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री अतुल चव्हाण यांच्याकडे प्रत्यक्ष पाठपुराव्यानंतर श्री अतुल चव्हाण यांच्या सूचनेनंतर हे काम विचारात घेतले गेले होते, मेे२०२४ मधे काम सुरु झाल्यावर मागील अनेक दिवसापासून सदर काम हे अपूर्ण स्थितीत होते दिनांक १३डिसेंबर२०२४ रोजी सा.बां. उपविभाग शिरूर सहाय्यक अभियंता यांना स्मरणपत्र देऊन सदर काम तात्काळ सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते, तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर सदर काम सुरू झाले. मात्र सध्या संबंधित ठिकाणी अशा बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात असेल सुरक्षेची काळजी घेतली जात नसेल तर याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो ठेकेदाराने निवीदेतील अटीशर्तींचा भंग केला आहे, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दाखल घेऊन याबाबत संबंधित ठेकेदारावरती हलगर्जीपना बेजबाबदार पणा निश्चित करून नागरीकाच्या जिवाशी खेळल्याबद्दल फौजदारी कारवाई करावी तसेच विभागातील जे अधिकारी यास जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल- "निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता)