कारेगाव ता.शिरूर जिल्हापरिषद
शाळेतील शिक्षकाने काही वर्गातील अल्पवयीन मुलींची असभ्य वर्तन करत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून या शिक्षकाने शिक्षेची पेशाला काळीमा फासला आहे. हा शिक्षक शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचा माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक असून , या शिक्षकाला राजकीय वारसा आहे म्हणून हे प्रकरण दाबण्यासाठी मोठा प्रयत्न झाल्याची ही चर्चा शिरूर तालुक्यात आहे.
या शिक्षकाने या अगोदर याचे प्रकार केल्याची चर्चा शिरूर तालुक्यातील शिक्षक वर्गामध्ये आहे.
या नराधम शिक्षकावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.
अनिल महादेव शेळके (वय. ५२, रा. सोने सांगवी, ता. शिरूर, पुणे) शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे शिक्षकाचे नाव आहे.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनिल शेळके हा कारेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन पीडित मुली यांना हा शिक्षक अभ्यास का केला नाही असे म्हणून, मुलींना जवळ बोलून त्यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य सप्टेंबर ते डिसेंबर २४ ह्या चार महिन्यात करीत होता. अखेर काही पीडित मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शाळेतील प्रशासन व गावातील प्रमुख नागरिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर शाळा प्रशासनाला व मुख्याध्यापक यांना जाग आली आहे.
याबाबत समजल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सप्टेंबर ते १८ डिसेंबर या चार महिने दरम्यान वेळोवेळी हा नराधम शिक्षक अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत होता. मात्र या शाळेतील इतर शिक्षकांना हे दिसत नव्हते का ? असा सवाल कारेगाव येथील काही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
नराधम अनिल शेळके या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस हवालदार अभिमान कोळेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे व सहाय्यक फौजदार राजेंद्र कर्डिले यांच्या आरोपीस अटक केली आहे.