रांजणगावात अंध व्यक्तीला एसटी बस चालक व वाहकाने केली शिवीगाळ

9 Star News
0
रांजणगावात अंध व्यक्तीला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
रांजणगाव पोलिसांत एसटी चालक व वाहकावर गुन्हा दाखल
शिरूर( प्रतिनिधी )
 रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे एस टी बस मधून अंध व्यक्तीस उतरण्यास उशीर झाल्याचा राग येऊन 
एस टी बस चालक व वाहकाने त्यांच्या अंधत्वावर बोलून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाणकेल्याप्रकरणी एस टी वाहक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन कौशल घोकडे हे अंध इसम एम एच २० बी एल ३४२० या एस टी मधून प्रवास करत असताना एस टी थांब्यावर ते अंध असल्याने लवकर खाली उतरले नाही, त्यामुळे एस टी वाहक व चालक यांनी त्यांच्या अंधत्वावर बोलून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केला. याबाबत कौशल विजय घोडके वय २३ वर्षे रा. भांबर्डे रोड रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच २० बी एल ३४२० या एसटीचे चालक व वाहक ( नाव पत्ता माहित नाही ) दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!