राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्याएकीवर अत्याचार; ५४ वर्षीय नराधमाला अटक

9 Star News
0
राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या

एकीवर अत्याचार; ५४ वर्षीय नराधमाला अटक
शिरूर 
 (प्रतिनिधी)- राजगुरूनगर (खेड) मधून गायब झालेल्या दोन्ही चिमुकल्या बहिणींची | हत्या झाल्याचे उघडकीस आले असून, शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानेच हे कृत्य केले आहे. नराधम आरोपीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एका मुलीवर या नराधमाने अत्याचार केला. राजगुरूनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, आरोपीला फाशी झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत मुलीच्या पालकांसह नागरिकांनी खेड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.

अजय दास (वय ५४) असे अटक केलेल्या | नराधमाचे नाव आहे. मुलींचा खूनवरून) करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी दास याला येथील एका लॉजमधून बेड्या ठोकल्या. त्याच्यावर राजगुरूनगर पोलीस ठाण्यात 'पोक्सो' सह खुनाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी राजगुरूनगरमधून दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसांकडे आली होती. घराबाहेर खेळत असलेल्या आठ आणि नऊ वर्षांच्या दोन बहिणी गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. रात्री उशिरा शहरालगत असलेल्या एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. छिन्नविछिन्न अवस्थेत एका ड्रममध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी दास या नराधमानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने मुलींना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले.

आरोपी आचारी म्हणून काम करतो. बुधवारी त्याने घराबाहेर खेळणाऱ्या मुलींना बोलावून घेतले.

एकीवर अत्याचार केला. त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आपले बिंग फुटेल, या भीतीने त्याने तिचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसऱ्या बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावली. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी दोन्ही बहिणींचे मृतदेह मिळविले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर इतर बाबी समोर येतील. पीडित मुलींचे वडील सफाई कर्मचारी, तर आई मोलमजुरीचे काम करते. या अत्यंत निर्दयी घटनेमुळे खेड तालुक्यासह सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुली पैकी एकीचा आज वाढदिवस असताना दुर्दैवाने तिचा दफनविधी करण्याची वेळ कुटुंबीयांसह नातेवाईकांवर आली.

भटक्या विमुक्त जाती, जमाती जोडो अभियानाचे ऑल इंडिया राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम हे मुलींच्या दफनविधीनंतर राजगुरूनगर पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसले आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!