वाघोली परिसरात गोळीबार ; तिघांवर गुन्हा दाखल

9 Star News
0
वाघोली परिसरात गोळीबार ; तिघांवर गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी (मुकुंद ढोबळे)
रुग्णवाहिकेतून मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नका, असे सांगूनही न ऐकल्याने मित्राने रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने बंदुकीतून दोन राउंड फायर केल्याची घटना वाघोलीत गुरुवारी (दि. १२) रात्री ९ च्या सुमारास बकोरी रोड येथील आर्यन बियर बार जवळ घडली. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची नसून तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 
      विशाल रामदास कोलते (रा. बकोरी), संदिप कैलास हरगुडे (रा. केसनंद) व अमोल राजाराम हरगुडे (रा. केसनंद) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक सुधाकर अरुण कानडे (वय ३५, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बकोरी रोडवरील बियर बार येथे रुग्णवाहिका चालक सुधाकर हे रुग्णवाहिका घेवून संदिप हरगुडे याला लोणी काळभोर येथील व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी आले होते. मात्र आपल्याला नेवू नये यासाठी संदीप याने विशाल याला सांगितले होते. यावेळी विशालने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून रुग्णवाहिका चालक सुधाकर कानडे याच्या दिशेने सरळ दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने त्या चालकाला लागल्या नाही. नंतर विशाल व अमोल याने रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती कळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून एकत्रितपणे दहशत पसरविणे तसेच रुग्णवाहिकेचे नुकसान करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रिव्हॉल्वर, तीन जिवंत काडतुसे, कार जप्त केल्या आहेत. पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!