हिवरे कुंभारमध्ये विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यूवायरमनला मदत करताना घडलेल्या घटनेने खळबळ

9 Star News
0
हिवरे कुंभारमध्ये विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
वायरमनला मदत करताना घडलेल्या घटनेने खळबळ
शिरूर 
( प्रतिनिधी ) हिवरे कुंभार ता.शिरूर येथे विजेच्या धक्क्याने 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून हा तरुण वायरमनला मदत करण्यासाठी आला होता यावेळी काम करताना त्याचा मृत्यू झाला आहे.
    किरण दिलीप धुमाळ (वय ३८ वर्षे रा. पिंपळे खालसा ता. शिरुर जि. पुणे )याचा मृत्यू झाला आहे.
 हिवरे कुंभार ता. शिरुर येथील विजेची तार तुटल्याने वायरमन राजेंद्र वैद्य यांनी मदतीसाठी गावातील भगवान गावडे व किरण धुमाळ यांना बोलावून घेतले होते, दरम्यान किरण हा विजेच्या खांबावर चढलेला असताना त्याला विजेचा धक्का लागून तो जमिनीवर कोसळला यावेळी त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी किरण दिलीप धुमाळ वय ३८ वर्षे रा. पिंपळे खालसा ता. शिरुर जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत भगवान प्रभू गावडे वय ४३ वर्षे रा. गावडे वस्ती हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!