शिरूर
( प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथील एका हॉटेलवर अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून, युवतीचे फोटो व्हायरल करण्याची तसेच कुटुंबियांना मारण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहन सोमनाथ नप्ते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील अल्पवयीन युवतीची रोहन नप्ते याच्या सोबत ओळख झाल्यानंतर रोहन याने युवतीशी ओळख वाढवून युवतीशी काही फोटो काढले, त्यांनतर रोहन याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिला लग्न करण्यासाठी कारमधून घेऊन गेला आणि युवतीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, तर याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रोहन सोमनाथ नप्ते रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले हे करत आहे.