शिरूर बस स्थानकात झोपलेल्या बस चालकाला परप्रांतीय तरुणांने डोक्यात लोखंडी टामिने मारल्याने चालक गंभीर...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      शिरूर एसटी बस स्थानकातील चौकशी ऑफिसमध्ये झोपलेल्या चालकाला मध्यरात्री परप्रांतीय तरुणांने कुठलेही कारण नसताना डोक्यात लोखंडी टामिने मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         संभाजी देवराव बर्गे (वय ४४ रा. शहागड ता. आंबड जि. जालना ) हे चालक मारहाणीत गंभीर जखमी झाले आहे.
       शिवधर सहानी ( रा -गोरखपुर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.
        याबाबत दिलावर अकबर तांबोळी ( रा. शिक्रापुर ता शिरूर जि पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
           याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 30 नोव्हेंबर पहाटे साडेतीनच्या दरम्यान शिरूर एसटी बस स्थानकातील चौकशी ऑफिस येथे झोपलेले चालक संभाजी बर्गे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी व तेथील सुरक्षारक्षक चौकशी ऑफिसमध्ये आले असता तेथे असलेल्या एका परप्रांतीय तरुणाने त्यांच्या हातातील लोखंडी टामीने चालक बर्गे यांच्या डोक्यात मारहाण करत असल्याचे दिसून आले. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले असता कुठलेही कारण नसताना त्यांनी चालकाला मारहाण केल्याची समजले. त्यानंतर परप्रांतीय तरुणाला शिरूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले तर चालक बर्गे यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून त्यांच्या डोक्याला 26 टाके पडले असून ते गंभीर जखमी आहे. 
        याबाबत फिर्यादीवरून परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहे. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!