राज्यातील महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातला पाठवायची होती ते पाठवले कारण शिंदे व पवार यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती तर फडणवीस मोदी अमित शहा यांच्या समोर बोलू शकत नाहीत त्यामुळे लाखो युवकांचा रोजगार गुजरातला पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असून पहिल्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या काळात झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मांडवगण फराटा येथे शिरूर विधानसभेचे महाविकास आघाडी उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवार अशोक पवार, श्रीगोंदा विधानसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, भारती शेवाळे,, राजेंद्र पायगुडे,बाळासाहेब नरके,शिवसेनेचे संजय सातव, हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी, शिरूर तालुका पमुख पोपट शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, बाळासाहेब म्हस्के दिलीप मोकाशी कांतीलाल होळकर, लतिकाताई वराळे, शंकर फराटे, व मोठ्या प्रमाणे नागरिक, मतदार, शेतकरी ऊस उत्पादक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले 20 नोव्हेंबर नंतर मतमोजणी होईल व राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सरकार येणार आहे ही काळा दगडावरची रेष आहे आणि सरकार येतात पहिल्या कॅबिनेट मंत्री मंडळा च्या बैठकीत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला 107 कोटी देण्याचा ठराव मंजूर करण्यात येऊन कारखाना सुरू करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला.
शिरूर हवेली चे उमेदवार अशोक पवार हे निष्ठेने व प्रामाणिकपणाने शरद पवार साहेब यांच्या बरोबर राहणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत तुमच्या निष्ठेने व प्रामाणिकपणाने तुमचे नाव झाले आहे. लफंगे व चोरांचे नाव होत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येतात महा लक्षमी योजनेअंतर्गत महिलांना महिना ३ हजार रुपये देण्यात येणार आहे. महिलांना एसटी प्रवास मोफत मिळणार तर बेरोजगारा तरुणांना महिन्याला चार हजार रुपये आमचे सरकार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विमा अंतर्गत कुटुंबासाठी 25 लाखाचा विमा उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आम्ही हे करणार आहोत हे सांगताना त्यांनी मोदींच्या मेडिकल कार्डचा कोणाला फायदा झाला का त्यांनी सांगावा तर आमदार अशोक पवार यांच्या कुटुंबांना गेली 15 ते 16 वर्षापासून त्रास देण्याची काम सुरू असून दमदाटी देण्याचे काम केले परंतू अशोक पवार यांनी शरद पवार साहेब यांना सोडले नाही यालाच निष्ठा म्हणतात असे पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले एन पी ए मध्ये नसताना केवळ मी त्यांच्यबरोबर गेलो नाही म्हणून घोडगंगा कारखान्याची कर्ज अडवले. न्हावर्याच्या सभेत कोण म्हणाले कोण मायचा लाल घोडगंगा सुरू करतो तेच बघतो कोण म्हणाले तू आमदार कसा होतो तेच बघतो केवळ त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून दमबाजी व कारखाना बंद पाडला असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी अजित पवार यांचे नाव नघेता केला. माझी निष्ठा शरदचंद्र पवार साहेबांबरोबर आहे आणि मी कायम साहेबांबरोबरच राहणार असेही आमदार पवार म्हणाले.
वाईच्या कारखान्यावर सहाशे कोटीचे कर्ज असताना त्यांना 500 कोटी रुपये कर्ज दिले कारण ते त्यांच्या पक्षांमध्ये गेली आणि शिरूर चा घोडगंगा कारखान्याला 107 कोटीची गरज असताना केवळ आमदार अशोक पवार त्यांच्या पक्षात गेले नाही म्हणून त्यांना कर्ज नाकारले हे योग्य नव्हते परंतु त्यांना न्यायालयाने चपराक देऊन हे 107 कोटी थांबवली असल्याचेही सांगितले. तर देशाचे सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्या कारखान्याला चौदाशे कोटी दिले असल्याचे सांगितले. परंतु माझा कारखाना काय खड्ड्यात गेला नव्हता त्याला एवढा निधीची गरज लागली मुरलीधर मोहोळ तुम्हाला सहकार कळण्यासाठी वेळ लागणार आहे हे लक्षात ठेवा असा टोलाही जयंत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांना मारला.