मांडवगण फराटा ता शिरूर येथे माझा मुलगा ऋषीराज पवार यांच्या बरोबर घडलेल्या प्रकार घृणास्पद व निंदणीय आहे विरोधक कुठल्या थराला जातील व कोणाकडून काय करून घेतील याचा नेम राहिला नसून माझ्या कुटुंबांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिरूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार व शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत करून आमदारकीसाठी विरोध कुठल्याही थराला जाऊ शकतात हे कालच्या घटनेतून दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात गृह खाते करते काय त्यांचा धाक राज्यात उरलेला नाही म्हणूनच अशी कृत्य सुरू असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला.
यावेळी शिरूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, घोडगंगाचे चेअरमन ऋषीराज पवार उपस्थित होते.
या प्रकरणात तीन जणांना अटक केली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी देऊन यातील महिला अद्याप फरार आहे. परंतु हे कृत्य करण्यासाठी कोणी भाग पाडले तो मास्टर माईंड पोलिसांनी शोधावा अशी मागणी करताना राज्यामध्ये गृहखाते करते काय ? राज्यात कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे का नाही असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
अटक केलेला आरोपी याच्यामागे कोण त्याला रोज भेटायला येते कोण त्याची कोणा कोणाशी संबंध आहे या सर्वांची चौकशी केली तर सत्य बाहेरील या प्रकरणातून मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याची राजकीय षडयंत्र असल्याचे पवार यांनी सांगितले.
या घटनेतील मूळ सूत्रधार याला पोलिसांनी अटक करणे गरजेचे आहे व त्याला कडक शासन झाले तरच अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत त्यासाठी पोलिसांनी आरोपीचा मोबाईल व त्यातील सर्व माहिती घेऊन कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेची निवडणूक आहे आम्ही कुठेही प्रचाराला जात असतो एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी चालत अशी जर मागणी करत असेल तर त्याच्या मागणी खातर त्या ठिकाणी प्रचाराला जावा लागते परंतु अशा ठिकाणी जाऊन अशी आघोरीकृत्य जर कोणी करायला भाग पाडत असेल तर ते निंदनीय आहे ऋषीराज हा केवळ आमदाराचा मुलगा हे सोडा तो एका कारखान्याचा चेअरमन आहे त्याला अशा प्रकारे डांबून ठेवून दोरीने गळा आवळून
अघोरीकृत्य जर करण्याचा प्रयत्न करत असतील व दहा कोटीची खंडणी मागत असतील तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी व याच्यामागे कोण आहे त्यांना अटक करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे .