घोडगंगा सहकारी साखर कारखाना चेअरमन ऋषीराज पवार यांच्यावर झालेला हल्ला व अपहरण प्रकरण याचा निषेध करीत असून या प्रकरणी प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ ऊली कटके यांनी केली आहे.
महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करताना हा प्रकार करणारा आरोपी हा तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा बूथ कमिटीचा प्रमुख असल्याचे सांगितले.
शिरूर-हवेली मतदार संघामध्ये गेमचेंजरची भूमिका असणाऱ्या वाघोलीमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शनिवार, रविवार या सुट्टयांचे औचित्य साधत प्रचार केला. यावेळी सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधत विकासाच्या भूमिका कटके यांनी मांडल्या.
शहरीकरणामुळे पुणे शहरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या वाघोली
गावात असंख्य गृहनिर्माण प्रकल्प (सोसायटया) उभे राहिले आहेत. वाघोलीच्या प्रत्येक भागामध्ये सोसायटया निर्माण झाल्या असल्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. वाघोलीत सुमारे ६८ हजार मतदार सध्या असून यापैकी सर्वाधिक मतदार हे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आहे. वाघोलीच्या मतदानात सोसायटी वर्गाची नेहमीच महत्वाची भूमिका राहिली आहे. अशातच शिरूर-हवेली निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार व वाघोलीचे मा. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शनिवार व रविवार सुट्टयांचे औचित्य साधत वाघोलीतील विविध
सोसायटीमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या भेटी घेतल्या. मतदारांशी संवाद साधत त्यांनी आगामी काळात विकास कामांच्या बाबतीत करणार असलेल्या भूमिकेची माहिती दिली. वाघोलीतील सोसायटीवर्गातून त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.