शिरूरचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये म्हणून दमबाजी करणारा नेता कोण? शरद पवार

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कारखाना सुरू करण्यासाठी एनसीडीसी या केंद्राच्या संस्थेकडून पैसे मंजूर झाले होते व त्या देण्यासाठी बँकेची कुठली हरकत नव्हती परंतु आलेले पैसे देण्यासाठी राज्य शासनाने नकार दिला होता याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना मी व आमदार अशोक पवार भेटलो परंतु त्यांनी हे कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देण्यासाठी माझी अडचण होती असे स्पष्ट सांगितल्याने मी ओळखून घेतले की ही अडचण करणारा नेता कोण? व त्यांना दम दिला असल्याचे माझ्या लक्षात आले असे म्हणत याच नेत्याने घोडगंगा कारखाना कसा चालू होतो बघतोच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली. 
   यानंतर सभेत पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणा सुरू झाल्या. या जाहीर सभेत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे नागरिक शेतकरी सर्वसामान्य व्यापारी उपस्थित होते.
 शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. 
         यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, व राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर प्रत्येक नागरिकाला २५ लाख रुपयाचे विमा संरक्षण तर महिलांना महिना तीन हजार रुपये देण्यात येतील असेही सांगून ते म्हणाले राज्य शासन घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडून सर्वसामान्य शेतकरी वर्गाची संसार मोडण्याचे काम करत आहे राज्यातील सरकार हेच काम करत असल्याचा आरोपहीं त्यांनी केला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले की लगेचच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी देऊन साखर कारखाना सुरू करून या भागातील शेतकऱ्यांची संसार पुन्हा उभे करू असा शब्दही पवार यांनी दिला.
. यावेळी उत्तमराव जानकर, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, स्टार प्रचारक हेमा कुलकर्णी, के डी कांचन, देविदास भन्साळी, जगन्नाथ शेवाळे, पोपट शेलार, वैभव यादव, विश्वास ढमढेरे, संजय सातव, मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
        घुमुदे घुमुदे तुतारी गाणे नागरीकांचा जल्लोष..... मोठ्या जल्लोषात शिरूर हवेली मतदारसंघात वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. 
     महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ॲड अशोक पवार म्हणाले समोरच्या उमेदवार यांचेकडे लँड माफिया , वाळू माफिया एमआयडीसी माफिया अशी गॅंग आहे या गॅंग विरोधात माझी लढाई आहे. नागरिकांनी आणि मतदारांनी सांगावे सांगा ही लोक यांच्याबरोबर आहेत का नाही आणि त्यांचे काय उद्दिष्ट आहे तेही सांगा.
 हवेली शिरूर जनतेचे धन्यवाद... जास्त संख्या हवेलीकरांची आहे. कसा सुरु होत नाही बघतोच असे शरद पवार साहेबांनी सांगीतले असून सात ते रात्री अकरा वाजे पर्यंत जनतेसाठी देतात. कर्ज माफी शरद पवार मुले झाली माझी निष्ठा साहेबांबरोबर आहे मी गद्दारी केली नाही. कारण गद्दारी शिक्का मरेपर्यंत जात नाही. शिरूर तालुक्यात ८५ टक्के 
सिंचन , एम् आय डी सी कोणामुळे हा तालुका साहेबामुळे सुजलंसुफलं झाला आहे त्यांनी जास्त प्रेम शिरूर तालुक्यावर केले असून पवार साहेब माझ दैवत आहे. शिरूर हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, तर पवार साहेबांनी सात हजार कोटी रुपयांचे दुमजली पूल मंजूर केला आहे त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडीचा चा प्रश्न सुटणार आहे.
.राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार आहे चा विश्वासही पवार यांनी दिला तर शिरूर तालुक्यावर आलेल्या
        संकटकाळी शरद पवार साहेब तालुक्याची तांदळी ते वडगाव राताई पर्यंत भेट दिली होती संकटकाळी धावून येणारा नेता म्हणजे शरद पवार असून त्यांच्यावर मरेपर्यंत माझी निष्ठा राहणार असल्याची ग्वाही अशोक पवार पवार यांनी दिली.
     
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!