मांडवगण फराटा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन ऋषीराज पवार यांच्यावर झालेला खंडणी व मारहाणीचा गुन्हा खरा असून आरोपी १५ लाख रुपये कर्ज झाले असल्याने त्यासाठी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असल्याची शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली
असून आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अंतर्गत अश्लील व्हिडिओ काढल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसाची पोलिस कस्टडी वाढवून देण्यात आली आहे.
ही घटना खरी असून याबाबत विरोधक राजकारण करतो त्यामुळे चांगली चपराक बसली आहे.
. . याप्रकरणी भाऊसाहेब विरा कोळपे (वय ३० वर्ष रा कोळपेवस्ती मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे), मयुर संजय काळे(वय २४ वर्ष, रा शिवाजी चौक, मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे) तुषार संजय कुंभार (वय २१ वर्ष रा मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे) या तीन जणांना अटक करण्यात आली असून चौथी महिला आरोपी प्रमुख आरोपीची असल्याची पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना पंधरा लाख रुपये कर्ज झाले होते .पैशासाठीच हा गुन्हा केल्याचे सांगीतले. या अपहरण घटनेचा बंगल्या मधील व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तो बंगला आरोपी यांच्या बहिणीचा असून त्या ठिकाणाहून घटनेत वापरलेली दोरी ,कापड,ताब्यात घेतले असल्याचे केंजळे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात ऐन निवडणुकी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव व घोडगगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांचे दिनांक ९ नोव्हेंबर रोजी अपहरण करून महिलेसोबत अश्लील फोटो काढून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला आरोपी अद्याप फरार आहे. अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी आरोपीवर आणखी एक गुन्हा नव्याने दाखल करण्यात आला असून त्यात त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.