रांजणगाव गणपती कारेगाव नंतर आता सरदवाडीत उभ्या बसचे डिझेल चोरी

9 Star News
0
सरदवाडीत उभ्या बसचे डिझेल चोरी
शिरूर 
( प्रतिनिधी ) सरदवाडी ता. शिरुर येथील माणिकचंद कंपनी समोरील मोकळ्या जागेत संतोष खेडकर यांनी त्यांच्या ताब्यातील एम एच ४० वाय ५९८७ हि बस रात्रीच्या सुमारास लावून ठेवलेली होती. सकाळच्या सुमारास संतोष हे बस जवळ आले असता त्यांना बसच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे आणि जमिनीवर डिझेल संद्ल्याचे त्यांना दिसल्याने बसची पाहणी केली असता बस मधील तब्बल एकशे तीस लिटर डिझेल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, याबाबत संतोष शंकर खेडकर वय ४० वर्षे रा. चिंचपु इजदे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ह्वालदार उमेश भगत हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!