शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आज शिरूर शहरात भव्य रॅली उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांचा सहभाग शहरात व कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आज शिरूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी सहभाग नोंदवल्याने शहरात व कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. 
          आज शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या प्रचार रॅलीची सुरुवात झाली 
            या प्रचार रॅलीत उमेदवार अशोक पवार उद्योगपती प्रकाश धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारीवाल हे प्रमुख आकर्षण ठरले. 
                संपूर्ण शिरूर शहरातील पेट्रोल पंप ,एसटी स्टँड, बाजारपेठ कापड बाजार आडत बाजार रामवाडी , मारुतीआळी सरदार पेठ, लाटे आळी, हलवाई चौक, सुभाष चौक ,सोनारआळी, इस्लामपुरा, ,बुरुडआळी कुंभारआळी, मुंबई बाजार, डंबेनाला, या भागातून या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. 
              त्यानंतर कापड बाजार येथे या रॅलीचे कोपरा सभा मध्ये रूपांतर झाले.
             यावेळी बोलताना उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाशभाऊ धारीवाल म्हणाले शिरूर शहराचा विकास करत असताना आमदार अशोक पवार यांनी मोठा निधी नगरपरिषदेस दिला आहे. यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागले असून, आमदार अशोक पवार आणि आमचे तीन पिढ्यांचे संबंध आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही. परंतु मैत्रीच्या संबंधातून मी अशोक बापू पवार यांच्या प्रचारात उतरत असतो आणि आजही असून,त्यांच्या बरोबर राहणे माझे नैतिक कर्तव्य आहे . आमचे सर्वच पक्षां बरोबर व त्यांच्या नेत्यांबरोबर मैत्रीचे संबंध आहे. परंतु शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मी आमदार अशोक पवार यांचे काम करणार हे सर्वांना माहीत असलेचे धारिवाल यांनी सांगितले.
          शिरूर शहरांमध्ये उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या बरोबर आणि त्यांच्या माध्यमातून शहराचा विकास आणि गती घेतली आहे शहरातील विकासासाठी जो निधी लागेल तो देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शहरासाठी भव्य एसटी स्टँड, नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार आहे, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावली आह. अद्यावत नगरपरिषद इमारत, शासकीय कार्यालयांच्या इमारती , यास अनेक विविध विकासकामे केली आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून शिरूर शहर नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहे आणि आजही उभे राहणार आहे यात शंका नसल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
          यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन ऋषिराज पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुकाध्यक्ष पोपट शेलार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्वासकाका भोसले, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे ,सुवर्णा लोळगे, अलकाताई सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख संजय देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव,शहराध्यक्ष किरण आंबेकर, ॲड.शिरीष लोळगे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा, निलेश लटाबळे,नगरसेवक अबिद शेख, मंगेश खांडरे, प्रवीण दसगुडे, वाल्मीकराव कुरंदळे पोपट दसगुडे, ॲड. प्रदिप बारवकर,रवींद्र खांडरे,बलदेवसिंग परदेशी, माजी शहर प्रमुख कैलास भोसले, शामकांत वर्पे, विलास कर्डीले,महिला शहराध्यक्ष स्मिता कवाद, शशिकला काळे ,राणीताई कर्डिले, प्रियांका धोत्रे, गीतारानी आढाव, संगीता शेजवळ ,ज्योती लोखंडे, संतोष शितोळे,सविता बोरुडे,राहील शेख, हाफीज बागवान ,कलीम सय्यद ,राजुद्दीन सय्यद, सुशांत कुटे, विशाल जोगदंड, सुनील बोरा, संजय ढमढेरे,विनीत बोरा, तुषार दसगुडे, व मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!