शिरूर विधानसभेचे उमेदवार कटके पवार निवडणुक अधिकारी यांनी बजावल्या नोटीस... खर्चात तफावत आढळल्या...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
          १९८ शिरुर विधानसभा मतदारासंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर माऊली कटके व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आमदार अशोक पवार यांना शिरूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत 48 तासाच्या खुलासा करण्याची नोटीस बजावली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे.
           
          खर्च प्रथम तपासणी दिनांक १० नोव्हेंबर रोजी रोजी शिरूर विधानसभा खर्च निरीक्षक यांचे उपस्थितीमध्ये ११ उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी करण्यात आली यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशोक रावसाहेब पवार, व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके, या दोन उमेदवारांच्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळून आली.
       खर्च निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर तफावतीबाबत दोघांना नोटीस बजावून ४८ तासाच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. 
      खर्चाची यानंतरची दुसरी तपासणी दिनांक १४ नोव्हेंबर व तिसरी तपासणी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी होणार असून याबाबत उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी यांना सांगण्यात आले आहे. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या खर्च तपासणी वेळी उमेदवार तसेच त्यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापूरकर यांनी दिली असून,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन-२०२४ च्या अनुषंगाने, १९८-शिरुर विधानसभा मतदार संघामधील मतदार नोंदणी, मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, EPIC कार्ड संबंधातील तक्रार तसेच आचारसंहीता संबधीत कोणत्याही प्रकारची मदत किंवा तक्रार असेल तर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी Voter Helpline Center Toll Free No. 02138-299147 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!