रांजणगावातून पुन्हा कंटेनरचे डिझेल चोरीशिरुर तालुक्यात महामार्गावर डिझेल चोरांचा सूळसुळाट

9 Star News
0
रांजणगावातून पुन्हा कंटेनरचे डिझेल चोरी
शिरुर तालुक्यात महामार्गावर डिझेल चोरांचा सूळसुळाट   
शिरूर 
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथून यापूर्वी एका कंटेनरचे डिझेल चोरीसह नंतर एकाच वेळी सहा कंटेनरच्या बॅटऱ्या व डिझेल चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका कंटेनरचे डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील राजमुद्रा चौकातील वैष्णवी टायर्स येथे संदीप राऊत यांनी त्यांचा एम एच १६ ए वाय ६२४३ हा कंटेनर काही कामानिमित्ताने लावलेले असताना चालक रात्री कंटेनर मध्ये झोपला होता, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास चालक उठला असता त्याला कंटेनरच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसल्याने त्याने पाहणी केली असता कंटेनर मधील डिझेल चोरीला गेल्याचे समोर आले, याबाबत संदीप शामराव राऊत रा. हिंगणी फाटा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!