घोडगंगा सहकारी साखर कारखाना साखर कारखाना सुरू करायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकारच्या एनसीडीसी या संस्थेने पैसे देणे महत्त्वाचे आहे व ही संस्था देशाचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या खात्याअंतर्गत आहे .माझे व अमितभाई शहा यांचे चांगले संबंध आहे तुम्ही शिरूर हवेलीतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना विजयी करा मग अमितभाई शहा यांच्याकडून व एनसीडीसी संस्थे कडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला पैसे आणून सुरू करण्याची जबाबदारी माझी असणार असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले आहे.
न्हावरे ता. शिरूर येथे महायुतीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते. या सभेला शिरूर हवेली भागातील मोठ्या प्रमाणात मतदार व नागरिक, शेतकरी यांनी गर्दी केली होती.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,,,दौलत शितोळे, राजेंद्र जासूद, राजेंद्र जगदाळे, प्रवीण काळभोर, रामभाऊ सासवडे, रवींद्र काळे, प्रदीप सोनवणे, शरद कालेवार, मयूर थोरात, निलेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर पी आय, व मित्र पक्षांचे कार्यकर्ते नेते हवेली शिरूर तालुक्यातील मतदार व नागरिक उपस्थित होते.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद होण्यात माझा कुठलाही हात नाही समोरचे उमेदवार भावकी अशोक पवार यांच्या चुकांमुळे हा कारखाना बंद पडला आहे माझ्यावर खापर फोडण्याचे कारण नाही. अरे बेट्या सगळीकडे माझ्या नावाची चर्चा करतोय की मी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडला आहे. मला घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडायचा असता तर मी सगळ्यात अगोदर वेंकटेश सहकारी साखर कारखाना बंद पाडला असता असे अजित पवार म्हणाले तुमच्या चुकांमुळे घोडगंगा सहकारी साखर कारखाना रसातळाला गेला आहे. या कारखान्यावर बँकेने ही जप्ती आणली आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना आज बंद असला तरी याच्या आसपास असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस घेण्याची जबाबदारी मी इतर कारखान्यांना सांगून तुमचा ऊस घेण्यासाठी त्यांना विनंती करेल व घोडगंगा पेक्षा जास्त भाव देण्याची त्यांना सांगेल असे सांगून, तिसरा टप्प्यातील औद्योगिक वसाहत करडे भागात येत आहे येथील कंपन्यांना साठी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आम्ही सर्वजण मिळून नवीन कायदा करून स्थानिक तरुणांना या औद्योगिक वसाहतीत ८० टक्के रोजगार देण्यासाठी कायदा करणार आहे. परंतु या ठिकाणी काम करत असताना स्थानिक तरुणांनी इमाने इमाने काम करावे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार यण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. या भागाचा व पुणे जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मला व शिरूर हवेली येथील महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांना विजयी करा असेही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना सांगितले.
यावेळी बोलताना शिरूर हवेली मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके म्हणाले यशवंत सहकारी साखर कारखाना व घोडगंगा साखर कारखाना अजित दादांच्य मदतीने सूरू करणार असून, शिरूर विधानसभेची निवडणूक सर्वसामान्य माय माऊलींनी हातात घेतले असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी देऊन या भागातील हेड टू टेल पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करणार असून कार्यसम्राट यांनी स्वतःचे फोटो काढून सहनभुती मिळवण्यासाठी शरद पवारांचे फोटो बॅनर वर वापरले आहे. दोन दिवसात हे विरोधक कुठल्या थराला जातील हे तुम्हाला कळणारच असल्याचे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले.