चिमुरडा सुदैवाने बचावला
( प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या बोलेरो कारने दुचाकील समोरून धडक देऊन झालेल्या अपघातात महिला ठार तर चिमूरडा बचावला आहे.
अश्विनी गणेश सासवडे (वय २८ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत गणेश बाळासाहेब सासवडे (वय ३५ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यारुन गितांजली हॉटेल मधून अश्विनी सासवडे या त्यांच्या मुलाला सोबत घेऊन एम एच १२ एन झेड ८५०२ या दुचाकीहून शिक्रापूर बाजूकडे चाललेली असताना शिक्रापूर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ ई एच १९६२ या बोलेरो वाहनाची अश्विनी यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली, दरम्यान समोरील वाहन भरधाव वेगाने आपल्या दुचाकीवर येत अल्स्याचे पाहूताच पाठीमागे बसलेल्या मुलगा रुद्र याने दुचाकीहून उडी मारून बाजूला गेला, यावेळी जोरदार धडक बसल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला तर बोलेरो रस्त्याचे कडेला चारीमध्ये गेली यावेळी बोलेरो वाहन चालक वाहन सोडून पळून गेला, दरम्यान नारीकानी जखमी अश्विनी सासवडे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अश्विनी गणेश सासवडे वय २८ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत गणेश बाळासाहेब सासवडे वय ३५ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच १४ ई एच १९६२ या बोलेरो वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – पिंपळे जगताप ता. शिरुर येथील अपघातात दुचाकीसह बोलेरोची झालेली दुरवस्था व सोबत मयत अश्विनी सासवडे.