शिरूर तालुक्यातील कामधेनू घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ठरवण्याचा अधिकार दादा तुमचा.... कारखान्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही भाग तुम्हाला मिळत होता का? ... कारखाना कसा सुरू होतो हे बघतोच म्हणणारे तुम्ही..... कारखान्याला लागणारे कर्ज अडवणारे तुम्ही.... आता तुम्ही सांगा घोडगंगा सुरू होणार आहे का? आणि नसेल सुरू होणार तर का सुरू होणार नाही याचे कारणही द्या. भ्रष्टाचार झाला म्हणता मग भ्रष्टाचाराचा सेनापती कोण? हेही आजच्या सभेत होऊन जाऊ द्या. परंतु माय बाप माझ्या शेतकऱ्यांचा कारखाना सुरू करा अशी हाक सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी करीत अजित दादा पवार करीत आहे.
तुमच्या आजच्या सभेत काहीतरी सांगा ना केवळ सुरू होणार का नाही ते तरी सांगा
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासन बंद आहे. हा कारखाना सुरू व्हावा अशी तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु यासाठी राज्य शासन आडकाठी आणत असल्याचे जाहीर झाले आहे. आमदार अशोक पवार तुमचेच होते ना ... त्यांना कारखान्याची चेअरमन चांगले काम करत होते म्हणून तुम्हीच नेमले होते ना.... मग राज्य शासनाच्या वाटाघाटीमध्ये बेडूक उड्या मारण्यामध्ये जे तुमच्या बरोबर उडी मारून आले नाही म्हणून तुम्ही घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिले नाही का?
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना याला कर्ज किंवा निधी न देण्याची कारण आमदार अशोक पवार अजित पवार बरोबर गेले नाही हे शिवतारे बापू यांनी त्यांच्या एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाइट मध्ये सांगितले हे खरे आहे का हेही सांगावे.
तर बँकेने घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठीचे 107 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे हेही सांगितले हेही आज तुम्ही सांगावे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून या भागातील तमाम जुन्या नेत्यांनी रक्ताचे पाणी केले राज्य शासनापासून केंद्र शासनापर्यंत हेलपाटे मारले आणि शिरूर तालुक्यातील कामधेनु घोडगंगा सहकारी साखर कारखाना मोठ्या दिमाखात सुरू झाला. परंतु त्यावर नियंत्रण तुमचे का व कशासाठी होते हेही सांगावे.
तुमच्या स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा वापर करून तुम्ही हा कारखाना बंद पाडल्याची पाप दादा केले आहे.
तुम्हाला कारखाना सुरू करायचा होतास तर आजपर्यंत तुम्ही या शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारा यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू का केला नाही आणि आता हा कारखाना सुरू करण्यासाठी त्याच्या जमिनीवर तुमच्या डोळा आहे हे नक्की आहे ना....
कारखानदारी टिकली पाहिजे शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेलात पाहिजे कारखाना सुरू झालाच पाहिजे परंतु तुमच्यासारख्या राजकारणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कारखान्याची कटपुतली बनवली आहे. तुम्ही म्हणेल तसे कारखाने चालतात आणि तुम्ही म्हणेल तसे कारखाने बंद होतात हे मात्र नक्की खरे आहे.
शिवतारे बापू ने केलेले वक्तव्य आणि बँकेने दिलेला दिलासा यातूनच तुमचा राजकारणातील खुनशिपणा हा दिसून आला आहे .तुमच्या या खुनशी राजकारणामुळे आमच्या भागातील कामधेनु बंद करू नका एवढीच अपेक्षा..... कारण तुम्ही यशवंत आतपर्यंत सत्ता असताना सुरू करू शकला नाही मग घोडगंगा काय सुरू करणार... हा तर तुम्ही तुमच्या अस्मितेचा विषय करून ठेवलाय आणि तुमच्या अस्मिते साठी तुम्ही शेतकऱ्यांचा बळी नक्कीच घेतलाय हे खरं आहे दादा.....