लोकसभेचा खेळ जुनाच.... प्रतिस्पर्धी उमेदवाराला नागरीकांसमोर बदनाम करण्याचं षडयंत्र जुने.... खासदारकीला जे केले ते पुन्हा विधानसभेला सुरू केले.... फंडा मात्र माजी खासदार अंगलट आला निवडणुकीनंतर कळाले.... त्यांच्या हातात निवडणूक... अन तेच फंडे वापरून महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करायचे षडयंत्र तर नाही ना...खास.... दार..
शेतकरी कसला हा तर मोठा नेता..... करतोय काम छोटा.....
आज शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महाविकास आघाडीचे आमदार व शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांचा गाव भेट दौरा होता. या दौऱ्या दरम्यान एक मोठी ब्रेकिंग न्यूज शिरूर हवेली तालुक्यातील नागरिकांना पाहायला मिळाली.
ही ब्रेकिंग न्यूज शिरूर हवेलीच्या अनेक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्टेटसला ठेवली होती.
असे वाटले होते की खरंच शेतकरी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद झाल्यामुळे मेटाकुटीला आला असेल.... परंतु ती ब्रेकिंग न्यूज व शेतकरी पाहिल्यानंतर खरंच ही लोक शेतकऱ्याला बदनाम करतात असे वाटू लागली आहे.
या सभेत भ्रष्टाचारी म्हणून हातात दांडके घेऊन कपाळी टिळा असलेला शेतकरी हा काय कोणी साधासुधा शेतकरी नव्हता. तो होता शिरूर तालुक्यातील राजकारणातील एकेकाळीचा व सध्याचा बडा नेता..... या नेत्यांनी त्याच्या कुटुंबातील लोकांनी पंचायत समिती पासून अनेक पदे भोगली आहे. एवढा मोठा ताकदीचा नेता ज्याचे नाव शिरूर तालुक्यात सर्वत्र आहे. तो महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा नेता ही होता व आता असेलही. त्याला तालुक्यात मोठी किंमत होती आजही आहे.
या नेत्यांनी शेतकऱ्याचे रूप धारण करून भर सभेत उसाचे टिपरू काढून आपला रोष व्यक्त केला हा रोष कशासाठी व मीडियाला हा रोष करणारा शेतकरी आहे परंतु त्या अगोदर तो एक मोठा शिरूर हवेलीतील नेता आहे हे समजणे गरजेचे होते.
परंतु महायुतीच्या उमेदवाराने जे खासदारकीमध्ये समोरच्या उमेदवाराला बदनाम करण्यासाठी जे जे लुप्त्या वापरल्या त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा झाली परंतु मतदानामध्ये त्याचे रूपांतर झाले नाही.त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
लुप्त्या वापरून समोरच्याला बदनाम करून साधणार काय? त्या अंगलट येऊ नये म्हणजे झाले. उमेदवाराला बदनाम करायचे षडयंत्र नाही ना....