शिरू तालुक्यातील मांडवगण फराटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन ऋषीराज पवार यांना प्रचारानिमित्त घेऊन जाऊन बंद खोलीत त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन तेथें महिला बोलून कपडे उतरण्यास सांगून महिलेबरोबर अश्लील फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन हे करण्यासाठी समोरच्या पार्टीने पुण्यातून दहा कोटीची सुपारी दिली असल्याची त्यांनी सांगितल्यानंतर यापेक्षा जास्त पैसे देतो असे पवारांनी सांगतात त्यांनी ते मान्य करून गाडीत पैसे घेण्यासाठी गेले आणि जाळ्यात सापडले.
आरोपींनी एक ते दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने बरोबर प्रचार करत होतो. त्या विश्वासाने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलो आणि त्यांनी घात केला.
या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात चर्चेंना उधाण आले असून, मोबाईल मध्ये राजकीय लोकांच्या चॅटिंग असल्याचे चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळतात मोठ्या प्रमाणात शिरूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे ठिय्या मांडला होता.
याबाबत ऋषीराज अशोक पवार (वय 30 वर्ष व्यवसाय. शेती रा. वडगावरासाई ता. शिरूर जि. पुणे ) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
भाऊ कोळपे (रा. माडवगाणंफराटा ता. शिरूर जि. पुणे) व दोन अनोळखी पुरुष इसम व एक महिला अनोळखी असे चार जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे ९ नोव्हेंबर दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे येथे भाउ कोळपे रा. मांडवगणफराटा ता. शिरूर जि. पुणे व इतर दोन अनोळखी यांनी काही मुले आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत असे म्हणुन दोन मोटर सायकल वरून मला घेउन जावुन एका बंगल्यामध्ये घेउन जावुन तेथे बेडरूम मध्ये मला डांबुन ठेवुन मला हाताने मारहाण करून माझा हाताने गळा आवळुन जबरदस्तीने माझे कपडे काढण्यास लावुन व काढून तेथे एका अनोळखी महीला हीस बोलावुन घेउन तीचे सोबत जबरदस्तीने अश्लील हलचाली करण्यास लावुन त्याची शुटींग काढुन त्या आधारे जीवे मारण्याची धमकी देउन मला १० कोटीची खंडणी मागणी करून मला बेडरूम मध्ये जबरदस्तीने डाबुन ठेवले त्यानंतर त्यांना मी पैसे देते सांगून जवळच असणाऱ्या गाडीजवळ घेऊन चला असे सांगितले त्यानंतर त्यांनी मला त्यांच्यात मोटर सायकलवर बसून गाडी पर्यंत घेऊन जाऊ लागले त्यादरम्यान मी माझ्या मोबाईल वरून बरोबर मित्रांना फोन करून घटनेची कल्पना देऊन आल्यानंतर याला पकडा अस सांगितले .त्यामुळे माझे मित्र सतर्क झाले. तेथे जाताच मुलांनी त्याला पकडले व बाजूच्या खोलीमध्ये दाबून ठेवून पोलिसांना बोलवले व त्याचा मोबाईल ताब्यात घेतला त्यानंतर पोलीस आल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर ऋषिराज पवार यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, सदर घटनेची माहिती कळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनेची माहिती घेऊन घटनास्थळाला भेट दिली.
आरोपींवर खंडणी, अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण हे गून्हे दाखल केले आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हणूमंत गिरी करीत आहे.
यावेळी बोलताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पीडित ऋषीराज पवार म्हणाले या गोष्टीला राजकीय वास असून या व्यक्तींना कोणी सुपारी दिली याचा आणि पक्षपाती तपास पोलिसांनी करून आरोपींना अटक करावी. आरोपी पकडला आहे त्याची इतर साथीदार फरार असून त्यांनाही लवकर अटक करावी. माझे कुटुंब व मला धोका असल्याच त्यांनी सांगितले. आरोपी पकडले आहे यामुळे सत्य बाहेर आले. राजकारण एवढ्या खालच्या थराला जर गेले असेल तर यासारखे दुर्दैव नाही असे पवार म्हणाले. आरोपींनी समोरच्या पार्टी व पुण्यातून सुपारी आले असल्याचे सांगितले आहे.