शिरुर ता. शिरुर येथील बाबुरावनगर मध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या ओळखीच्या प्रेमानंद कांबळे या इसमाने वारंवार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करुन महिलेशी बोलून तसेच महिलेला वेगवेगळे मेसेज करुन तू माझ्याशी बोलली नाही तर मी तुझी बदनामी कारले, तुझ्या नवऱ्याला वेडेवाकडे काही सांगून तुझा संसार मॉडेल अशी धमकी दिली, त्यांनतर प्रेमानंस याने महिलेशी झालेल्या बोलण्याचे स्क्रीन शॉर्ट महिलेच्या पतीला पाठवून नंतर महिलेला फोन करुन महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे केले, याबाबत पिडीत महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रेमानंद शिवाजी कांबळे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथा जगताप हे करत आहे.
शिरुरमध्ये महिलेचा मोबाईलवरुन विनयभंग
नोव्हेंबर ०८, २०२४
0
शिरुरमध्ये महिलेचा मोबाईलवरुन विनयभंग
Tags