समाजातील गोरगरीब व वंचित कुटुंबांना दिवाळी सण साजरा करता यावा याकरिता शिरूर शहर नाभिक संघटनेच्या वतीने एक हात मदतीच या उपक्रमांतर्गत माहेर संस्थेतील अनाथ मुले व पालावर राहणारे गोरगरीब यांना मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे.
शिरूर शहर नाभिक संघटनेच्या वतीने दिवाळीनिमित्त रामलिंग रोड माहेर संस्था व इतर कुटुंबांना संघटनेने मिठाई वाटप केले असून शिरूर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष सनी थोरात ,उपाध्यक्ष तेजस गायकवाड, कार्याध्यक्ष वैभव रायकर ,तसेच भाऊसाहेब क्षीरसागर ,गोरख गायकवाड, गणेश शिंदे रंणजीत गायकवाड, संतोष गायकवाड ,गणेश जाधव सुरेंद्र कडूसकर ,निलेश गायकवाड, सोमनाथ देव्हाडे ,बाळासाहेब गायकवाड ,समीर शिंदे, एकनाथ गायकवाड व इतर सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
शिरूर येथील रामलिंग रस्त्यावरील माहेर संस्थेची अनाथ मुलांना आज मिठाईची वाटप केले आहे तर रेणुका माता मंदिर प्रीतम प्रकाश नगर येथे पालावर राहणारे गोरगरीब बांधवांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष रणजीत गायकवाड म्हणाले समाजातील वंचित गोरगरीब व अनाथ मुलांना त्यांची दिवाळी ही गोड व्हावी अशी इच्छा असते ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शिरूर शहरातील नाभिक बांधव एकत्र येऊन या गोरगरीब अनाथांची दिवाळी गोड केली असून यातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.