यशस्वीनी वेलफेअर फॉउंडेशन वतीने आज दिवाळी पाडवा सणाच्या निमित्त अपंग मूकबधिर दिव्यांग बांधनवना ब्लॅंकेट मिठाई फराळ भांडी वाटप करण्यात आले.
यशस्विनी वेलफेअर फॉउंडेशन हे पाचवे वर्ष असून. दिवाळी पाडवा हा सण दिव्यांग बंधू-भगिनींबरोबर साजरा करावा हा एकमेव उद्देश असून गेली पाच वर्षापासून हा उपक्रम करण्यात येत आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनीष सोनवणे, रेणुका मल्लाव सिद्देश गवारे यांचे सहकार्य मिळाले. यशस्विनी वेल फेअर फॉउंडेशन सचिव नम्रता गवारे यांनी नियोजन केले.
समाजातील उपेक्षित गोरगरीब दिव्यांग बंधू-भगिनींची दिवाळी आनंदाची जावो यासाठी दरवर्षी यशस्वी वल्फेअर फाउंडेशन च्या वतीने या बांधवांना मिठाई ब्लॅंकेट व भांड्यांचे वाटप करण्यात येत असून, केवळ सामाजिक बांधिलकीने हा उपक्रम केला जात असल्याची सांगितले.
नम्रता गवारी,यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन