आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखाना कसा सुरु होत नाही तेच मी पाहतो." असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.ते बारामती येथील गोविंद बागेत कार्यकर्ते दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, की " राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यावर मी स्वतः पुढाकार घेऊन घोडगंगा साखर कारखाना सुरु करणार आहे. सध्या राज्याचे सत्ताधारी सत्तेचा गैर वापर करीत आहेत. महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. त्यामुळे राज्य अडचणीत आले आहे. विकासा बाबत जनतेला जागृत करणे आवश्यक आहे. राज्याचा विकासात देशात पहिला नंबर होता परंतु आता सहावा नंबर आहे. इतर राज्य विकासात पुढे गेले आहेत. लोकांनी आपल्याबरोबर असताना त्यांना निवडून दिले परंतु त्यांनी स्वार्थासाठी आपली साथ सोडली आहे.
१९८० साली माझ्या बरोबर ५८ आमदार निवडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणुन काम करीत होतो. परंतु ५२ आमदारांनी आमची साथ सोडत पक्षांतर केले होते. फक्त ६ आमदार माझ्या सोबत होते. पुढे झालेल्या निवडणुकीत ५२ आमदरांपैकी एकही आमदार निवडून आला नाही. अगदी तीच परिस्थिती यावेळीही होणार आहे. त्यांच्या विरोधात गेल्यावर संबंधित व्यक्तीच्या संस्था बंद केल्या जातात. कोणतीही कारखानदारी खासगी नाही शेतकरीच कारखान्याचा मालक आहेत. यासाठी आमदार अशोक पवार यांना शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातुन भरघोस मतांनी विजयी करा."
यावेळी कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, सुलभा उबाळे, राजेंद्र सातव, प्रदिप कंद, सतीष कोळपे, सुभाष कोळपे, अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे : येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आमदार अशोक पवार यांची बाजू भक्कम झाल्याची माहिती पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी दिली. शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष ढमढेरे, जावेद बागवान व मनोज आल्हाट यांनी या वेळी प्रवेश केला. यावेळी श्रीनिवास पवार, आमदार अशोक पवार, अनिल भुजबळ, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, बाजार समितीचे माजी संचालक सुदीप गुंदेचा, बाळासाहेब ढमढेरे, काकासाहेब जेधे, सुधीर जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय ढमढेरे, राजेंद्र घुमे आदी उपस्थित होते.
सुरू करण्याला प्राधान्य दिले जाईल." आमदार अशोक पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, माजी जिल्हा P
परिषद सदस्या सुजाता पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, शिरूर- हवेली मतदारसंघाचे कॉंग्रेसचे अध्यक्ष पैलवान संतोष गव्हाणे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, शिरूर शहर कार्याध्यक्ष हाफीज बागवान, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहील शेख, शहर उपाध्यक्ष कलिम सय्यद, शंतनू महेंद्र मल्लाव, युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अमजद पठाण, स्मिता कवाद, सविता बोरुडे, गीता रानी आढाव उपस्थित होते.