आगामी शिरूर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात शिरूर पोलीस स्टेशनकडून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पथ संचलन (रूट मार्च)करण्यात आले .
मांडवगण फराटा,कोळपे वस्ती,वडगाव रासाई या भागात हा रूट मार्च घेण्यात आला.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या फैरी चांगल्याच झडत असून प्रत्येक गावोगावी पोहचून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच तांदळी येथे तपासणी नाका उभारला असून त्या ठिकाणी गाड्यांची कसून तपासणी होत आहे.
मांडवगण फराटा,कोळपे वस्ती,वडगाव रासाई ता.शिरूर जि. पुणे या गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आला.सदर रूट मार्च कामी २ पोलीस उपनिरीक्षक. १५ पोलीस अंमलदार व सीमा सुरक्षा बल कंपनीचे ४ अधिकारी तसेच ३० जवान असे एकूण ६ अधिकारी व ४५ जवान माध्यमातून रूट मार्च घेण्यात आला.
शिरूर पोलिस स्टेशन व मांडवगण आउट पोस्ट पोलीस, सीमा सुरक्षा बल प्रत्येक गावावर बारीक लक्ष देत असून त्यांनी गावोगावी पथसंचलन केले असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.