बॅनर हटवल्याचा खोटा प्रचार... विरोधकांनी घेतली धास्ती वावड्या उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
 पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांमध्ये आमदार अशोक पवार यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशोक पवार यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे.आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटवून त्याठिकाणी शरद पवार यांचे बॅनर लावल्यामुळे पूर्व-शिरूर व हवेली परिसरात विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत.
           शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे उभे आहेत. अशोक पवार दोन टर्म आमदार असल्याने व त्यांची अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. शिवाय, अशोक पवार यांची कार्यसम्राट अशी ओळख आहे. अशोक पवार यांच्या कामामुळे त्यांना मतदार संघामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अशोक पवार यांचे गावोगावी मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सही प्रतिक्रियांच्या माध्यमातून अशोक पवार यांना पाठिंबा दर्शवित आहेत. अशोक पवार यांना सर्वच पातळ्यांवर मिळत असलेला मोठा प्रतिसाद मिळत आहे , गुरुवारी देशाचे नेते शरद पवार यांची वडगाव रासाई येथे जाहीर सभा होणार आहे याच अनुषंगाने मतदारसंघात अशोक पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून अशोक पवार यांची लावलेले बॅनर काढून त्या जागी शरद पवार यांची बॅनर लावले जात आहे, मात्र या गोष्टीचा विरोधक भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. शिरूर-हवेलीचा कल राजकीय जाणकारांच्या मते निर्णायक वळणावर झुकलेला असताना मोठी रंगत निर्माण झाली आहे. अनुभूवी, अभ्यासू व कसलेल्या पैलवानाप्रमाणे कार्यरत असलेल्या अशोक पवार यांनी राजकीय डावपेच साधत नवीन खेळी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मतदारसंघात अशोक पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेच्या निमित्ताने निष्ठा व शरद पवार यांचा फोटो असलेले फ्लेक्स मतदारसंघात लावल्यामुळे विरोधकांनी या बॅनरची धास्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!