शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून तीघे एक वर्षासाठी तडीपार - संदेश केंजळे

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
      शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मंदिर दानपेटी व शेती पंप चोरी करणाऱ्या टोळीतील तिघा जणांना एकवर्षासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. 
      शिरूर तालुका, पुणे जिल्हा,पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर, पारनेर श्रीगोंदा (अहिल्यानगर) या भागातून तडीपार करण्यात आले आहे.
    सौमित्र नाथा निचीत (वय २२वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि. पुणे), विकास बबन निचीत (वय ३० वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि. पुणे), सागर हौशिराम रणसिंग (वय २७वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरूर जि.पुणे) या तिघा जणांना तडीपार करण्यात आले आहे.

शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२३ या कालावधीमध्ये वडनेर खुर्द, आणापुर, आमदाबाद या परीसरासह शिरूर तालुक्यातुन मंदिर दानपेटी व शेती पंप , पाणी उपसा मोटारींची चोरी झाली त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ५ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरीता शिरूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस ठाणे तपास पथक व टाकळीहाजी पोलीस चौकीचे अधिकारी अमंलदार यांना सांगुन त्याप्रमाणे तपास पथकाने चोरांचा कसुन शोध घेवुन सदर इलेक्ट्रीक मोटार चोरी, दानपेटी चोरी करणारे वरील तिघांना अटक करण्यात आली होती
     त्यांचेकडुन सुमारे ४ इलेक्ट्रीक पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आले होते. व त्यांना ४ ते ५ गुन्हयात अटक करण्यात आले होते. याबाबत पुणे ग्रामीण ची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गंभीर दखल घेत विधानसभा निवडणुक सन २०२४ ची आदर्श आचारसंहीता जारी असल्याने कायदा व सुव्यवस्था आबाधिक राहण्याकरीता सदर आरोपीतांना १२ महीण्याकरीता (१ वर्षाकरीता) पुणे जिल्हा (पिंपरीचिंचवड शहर व पुणे शहर आयुक्तलयासह) अहील्यानगर (अहमदनगर) जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन तडीपार करण्यात आले आहे.
         ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी
प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलीस निरीक्षक अशोक शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार महेश बनकर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार परशराम सांगळे व पोलीस अमंलदार सचिन भोई, यांनी कामकाज पाहीले आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!