कान्हूर मेसाईत महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

9 Star News
0
कान्हूर मेसाईत महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग
शिरूर 
( प्रतिनिधी ) कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीचा वारंवार पाठलाग करुन युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अक्षय किसन पिंगळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   
                        कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीची ओळख अक्षय पिंगळे याच्या सोबत झालेली असल्याने अक्षय वारंवार युवती महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करुन तिच्याशी बोलत होता, दरम्यान अक्षयने युवतीसोबत फोटो काढला होता, त्यांनतर अक्षय याने युवतीला एका ठिकाणी बोलावून घेत सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला, याबाबत पिडीत अल्पवयीन युवतीने आपल्या आई वडिलांना सांगत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अक्षय किसन पिंगळे रा. मिडगुल वाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार सह विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!