शिरुर,प्रतिनीधी
शिरूर शहरातील पाषाण मळा येथे बिअरशॉपीचे शटर ड्रायडे पूर्वी चोरट्यांनी उचकटून बिअरशॉपी तील तब्बल वीस बिअरचे बॉक्ससह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सचिन कारभारी घावटे (वय ४४ वर्षे रा. घावटे मळा रामलिंग शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरुर (ता. शिरुर) पाषाण मळा येथील साक्षी बिअर शॉपी नावाने सचिन घावटे यांची बिअर बिअरशॉपी असून घावटे हे रात्रीच्या सुमारास बिअरशॉपी बंद करुन गेले होते, दुस-या दिवशी सकाळच्या सुमारास शजारील नागरिक कामाला जाताना त्यांना बियर
शॉपीचे शटर उचकटल्याचे दिसून आल्याने त्यानी याबाबतची माहिती सचिन घावटे दिली.
त्यानंतर घावटे यांनी बिअरशॉपी मध्ये जाऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल वीस बिअरच्या बॉक्ससह रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत सचिन कारभारी घावटे (वय ४४ वर्षे रा. घावटे मळा रामलिंग शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहे.