( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर हे पुणे नगर महामार्गावरील सर्वात महत्वाचे गाव असल्याने येथे अनेकदा राजकीय घडामोडी करणारे ताशे विविध फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत असताना नुकतेच या महामार्गावर लावण्यात आलेला राम कृष्ण हरी फ्लेक्स चर्चेचा विषय बनला आहे. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी का ? दुसरे काही नागरीक मात्र संभ्रमात...
शिक्रापूर ता. शिरुर हे पुणे नगर महामार्गावरील सर्वात महत्वाचे गाव असल्याने येथे वर्षभर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी, आंदोलने, उद्घाटने, लग्न सोहळे, दशक्रिया, नेत्यांचे वाढदिवस यांसह विविध कार्यक्रम व उपक्रमाचे फ्लेक्स लागत असतात, तर येथे लागणाऱ्या फ्लेक्समुळे वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, सध्या येथील महामार्गावर नव्याने भलामोठा एक फ्लेक्स लावण्यात आलेला असून त्यावर फक्त राम कृष्ण हरी हे अक्षर असून अन्य कोणताही शब्द अथवा अक्षर नसल्याने या फ्लेक्सचा अर्थ काय व त्या फ्लेक्स मुळे काय साध्य होणार आणि राम कृष्ण हरी नावाचा फ्लेक्स लावला कोणी याबाबत काहीही माहिती नसून सध्या सदर फ्लेक्स चर्चेचा विषय बनला असून पुणे नगर महामार्गावर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.