शिरूर सतरा कमानी पुलाजवळ पुणे अहिल्यानगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसने जोरदार धडक देऊन झालेला अपघातात मोटरसायकल वरील तरुण जागीच ठार झाला आहे.
दत्तात्रय शिवराम शिंदे( वय ३६ वर्षे,रा शिंदेवाडी मलठण ता शिरूर जि- पुणे) हे या अपघातात मरण पावले आहे.
विकास शिवराम शिंदे (वय 33वर्षे व्यवसाय शेती, रा शिंदेवाडी मलठण ता शिरूर जि- पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत लक्झरी बस नं. एम. पी. १३. झेड. इ.०७४८ वरील चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे ३० नोव्हेंबर मध्यरात्री साडेबारा वाजता शिरूर गावाजवळ पुणे अहमदनगर पुणे अहिल्यानगर महामार्गावर सतरा कमान पुलाजवळ शिरूर गावमध्ये येणारे चौकात रोडवर शिरूर ता. शिरूर जि. पुणे येथे माझा मोठा भाउ दत्तात्रय शिवराम शिंदे यय ३६ वर्षे हा त्यांचे ताब्यातील मोटार सायकल नं. एम. एच. १२. एफ. जे. १७३१ वरून शिरूर मध्ये येणेसाठी मोटार सायकल चालवित रोड कॉस करीत असताना पुणे बाजुकडुन अहिल्यानगर बाजुकडे जाणारे लक्झरी बस नं. एम. पी. १३. झेड.इ.०७४८ वरील चालकाने त्याचे ताब्यातील लक्यरी बस ही भरधाव वेगात, हयगयीने, निष्काळजीपणे, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवुन बसची मोटार सायकला जोरदार धडक मारून अपघात करून अपघातामध्ये दत्तात्रय शिंदे गंभीर जखमी होवुन त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघातानंतर बस चालक पळून गेला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साबळे करीत आहे.