शिक्रापुरात गटारलाईन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावररस्त्यावरील पाण्याने नागरिक व व्यावसायिक हैराण

9 Star News
0
शिक्रापुरात गटारलाईन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर
रस्त्यावरील पाण्याने नागरिक व व्यावसायिक हैराण
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरात गटार लाईन फुटून गटार मधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचले जाऊन काही लहानमोठे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या असून रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक व व्यावसायिक हैराण झाले असताना गटार लाईन दुरुस्थ करण्याची मागणी नागरिक करत आहे.
                          शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौक परिसरात चाकण रस्त्याचे कडेने ग्रामपंचायतची बनवण्यात आलेली गटार लाईन असून मागील आठवडा भरापासून सदर गटार लाईन फुटून गटारचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचले गेले असून रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याला देखील खड्डे पासून लहान मोठे पघात घडू लागले आहे, तर येथील व्यवसायिकांना व्यवसाय करणे जिकरीचे झाले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्याचे कडेला उभे राहण्याची वेळ आली आहे, रस्त्यावर साचल्या गेलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत असून प्रशासनाने गटार लाईन दुरुस्थ करण्याची मागणी नागरिक करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिक्रापूर येथील चौकातील गटार लाईन दुरुस्तीसाठी त्या भागातील काही व्यवसायिकांच्या दुकानासमोरील शेडमुळे अडचण होत असून त्या व्यवसायिकांना त्यांचे शेड काढण्यास सांगितले असून त्यांनतर गटार लाईन दुरुस्त केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.   
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौकात रस्त्यावर साचलेले गटारचे पाणी
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!