शिरूर
( प्रतिनिधी ) निर्वी ता. शिरुर येथे शेतकऱ्याच्या शेतातील बाजरीची कणसे पेटवून दिल्याची खळबळजणक घटना घडली असून यावेळी बाजरीचे फोटो काढायला गेलेल्या युवकाला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे जयसिंग दगडू आकुटे, दिपक जयसिंग आकुटे, कोमल जयसिंग आकुटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्वी ता. शिरुर येथील सोपान आकुटे यांनी त्यांच्या शेतात बाजरीचे पिक घेऊन सदर बाजरीची कणसे हेतात काढून ठेवलेली होती, त्यावेळी सोपान आकुटे यांच्या कुटुंबीयांनी पेटवून दिली, दरम्यान सदर जाळलेल्या कणसांचे फोटो काढण्यासाठी सोपान यांचा मुलगा साहेबराव गेला असता सोपान सह त्यांच्या मुलगा व सुनेने साहेबरावला शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण केली, याबाबत सोपान दगडू आकुटे वय ५५ वर्षे रा. निर्वी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी जयसिंग दगडू आकुटे, दिपक जयसिंग आकुटे, कोमल जयसिंग आकुटे सर्व रा. निर्वी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद मोरे हे करत आहे.