सत्तेत सहभागी न झाल्याने कारखाना बंद पाडण्याचे पाप सत्ताधारी लोकांनी केले.मात्र या निवडणुकीत जनता त्यांच्या या कृत्याला माफ करणार नाही.कारखाना कसा सुरु होत नाही तेच मी पाहतो असे शरद पवार यांनी सांगितले आहे.त्यामुळे कारखाना लवकरच सुरु होईल असे आवाहन महाविकास आघाडीची उमेदवार आमदार अशोक पवार यांनी केले. याबाबत पुरंदर ते माजी मंत्री यांनीही घोडगंगा कारखाना का बंद झाला हे टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच न्यायालयाने ही बाजू सांगितली आहे.
वढु बुद्रुक(ता.शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आ.अशोक पवार यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला.
मंगळवारी (ता.५) पवार यांनी तालुक्यातील वढू बुद्रुक,कोरेगाव भीमा,आपटी,वाजेवाडी,पिंपळे जगताप,वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी,धानोरे,दरेकरवाडी,सणसवाडी,शिक्रापूर,कोंढापुरी,भांबर्डे आंबळेसह अनेक गावांना भेटी दिल्या.
पवार म्हणाले,विरोधकांनी मला त्रास देण्यासाठी माझ्याच नावाचे दोन उमेदवार उभे केले आहेत.मात्र जनता ही सुज्ञ आहे ती मलाच मतदान करेल.बँकेचा संचालक करतो,एमआयडीसीत ठेकेदारी देतो मात्र त्यासाठी आमच्या पक्षात या अशी अनेक प्रलोभने सत्ताधारी पक्षाचे नेते अनेकांना पक्षात घेण्यासाठी दाखवत आहेत.मात्र या मलिदा गँगला या निवडणुकीत जनता त्यांना कदापि माफ करणार नाही.अजिबात चिंता करू नका.शरद पवार यांच्या मागे तरुणांचे मोठे पाठबळ असल्याने राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.मतदान यंत्रामध्ये माझे नाव पहिल्याच क्रमांकावर आहे.त्यामुळे बघाबघीच्या भानगडीत पडू नका.राज्याचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक असल्याने सर्वांनी आपणच उमेदवार आहे
असे समजून मतदान करावे.असे आवाहन महाविकास आघाडीची उमेदवार आमदार अशोक पवार यांनी केले.
मतदारसंघातील उर्वरित कामे मार्गी लावली जातील.दुसऱ्याचा पक्ष चोरू नका तर स्वतःचा पक्ष काढा असं म्हणणाऱ्या लोकांनीच पक्ष फोडले.काही आमदार पक्ष फोडले.तीच लोकं रात्री वेशांतर करुन पक्ष फोडाफोडीचं काम करत होते.या निवडणुकीत मला विजयी केल्यास राज्याने नव्हे तर देशाने आदर्श घ्यावा असे काम करून दाखवणार आहे.चासकमान धरण व पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही शिरूर तालुक्याला शरद पवार यांनी तालुक्यातील जनतेला दिलेली मोठी देणगी आहे.त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका अशी ओळख असणारा तालुका शेती व औदयोगिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध झाला आहे असे बोलताना पवार यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँगेसचे अपक्ष उमेदवार शांताराम कटके,मांडवगण फराटाचे माजी सरपंच शिवाजी कदम व भाऊसाहेब जाधव यांनी आमदार अशोक पवार यांना जाहिर पाठिंबा दर्शविला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे,कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेंरगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.