शिरूर शहरात महिलेला बोलण्यात गुंतवून तिला भुरळ पाडून तिच्याकडील ७८ हजाराचे दागिने दोन तरुणांनी चोरून नेले

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर हॉटेल्स श्रेयांसमोरील फुलावर रस्त्याने जाणाऱ्या महिलेला बोलावून आमच्याकडे पैसे असून ते अर्धे अर्धे आपण वाटून घेऊ असे सांगून महिलेला भुरळ पाडून तिच्या कानातील व गळ्यातील मंगळसूत्र असा ७८ हजाराचा ऐवज दोन तरुणांनी हात चला किनी चोरून नेला आहे.
        याबाबत छबुबाई नारायण बनसोडे, (वय 55वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी रा - मु.पो. पाचर्णेमळा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 
          याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
        याबाबत शिरो पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 29 नोव्हेंबर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिरूर सुजरनगर येथील हॉटेल श्रेयश शेजारील पुलावर जुने पुणे शिरूर हायवे रोडवर, हॉटेल जोगेश्वरी समोर अशा अंतरात फिर्यादी महिलेला दोन अनोळखी तरुणांनी आजी म्हणुन बोलावुन घेवुन बोलण्यामध्ये गुंतवुन महिलेला आमच्याकडे रुमालात पैसे आहे हे वाटून घ्यायचे त्याचे सांगून महिलेची दिशाभुल करून महिलेला भुरळ पाडून तिच्या कानातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, वेल व गळ्यातील तीन ग्रॅम चे मंगळसूत्र असा एकूण ७८ हजार रुपये ऐवज घेऊन पसार झाले. या तरुणांचे अंदाजे वय पंचवीस असल्याचे महिलेने फिर्यादीत सांगितले असून, शिरूर पोलीस स्टेशन येथे तरुणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप करीत आहे. 


 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!