तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गोरक्षकांना 3 वासरे अज्ञात इसमांनी कत्तलीसाठी घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बांधलेली आढळून आली असून ,गोरक्षकांमुळे त्यांना जीवदान मिळाले आहे.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेशदादा शिंदे,निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळेविठ्ठलवाडी चे उपसरपंच महेंद्र गवारे यांच्या सहकार्याने मयूर सुर्यवंशी ,महेश सुर्यवंशी ,अभी चंद्रकांत ढमढेरे ,संचित भुजबळ ,लहू चोरमले यांच्या मार्फत सदर वासरे हि सुखरूप लोणीकंद येथील श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान लोणीकंद या गोशाळेत सोडण्यात आली.
यावेळी सदर वासरे कत्तलीपासून वाचल्याने तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी आणि वासरे वाचविलेल्या गोरक्षकांनी आनंद व्यक्त केला. सदर प्रक्रियेमध्ये लोणीकंद येथील श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान लोणीकंद गोशाळेत निमगाव म्हाळुंगीचे विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे आणि गोशाळा गोरक्षा अधिकारी दिनेश जैन यांनी सदर वासरे गोशाळेत दाखल करून घेतली. यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी सर्व गोरक्षकांचे कौतुक करून आभार मानले.