तांदळीच्या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस चोरी

9 Star News
0
तांदळीच्या शेतकऱ्याच्या शेतातील कापूस चोरी 
शिरूर प्रतिनिधी
तांदळी ता.शिरुर येथील शेतकऱ्याने शेतात पिकवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तांदळी ता. शिरुर येथील शरद गदादे यांनी त्यांच्या शेतात कापसाचे पिक घेतले असून गदादे हे दिवसभर शेतातील काम आटोपून घरी आलेले होते, त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शरद गदादे हे शेतात गेलेले असताना शेतातील कापूस पाहण्यासाठी गेलेले असताना शेतातील तब्बल पंधरा गुंठे क्षेत्रातील कापूस चोरीला गेल्याचे दिसून आले, याबाबत शरद मच्छिंद्र गदादे वय ३५ वर्षे रा. तांदळी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक शिंदे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!