शिरूर
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे मागील आठवड्यात शेत कामाचे साहित्य आणण्यासाठी चाललेले इसमांच्या दुचाकीला समोरून आलेल्या दुचाकीची धडक बसून जखमी झालेल्या इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून अनिल विश्वनाथ हिरवे असे सदर इसमाचे नाव आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील धायरकर वस्ती येथून ११ नोव्हेंबर रोजी चंद्रसिंग गायकवाड व अनिल हिरवे हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच २५ बी बी २०२४ या दुचाकीहून शेतातील पिकांच्या कामासाठी औषध फवारणीचे पंप आणण्यासाठी चाललेले असताना तळेगाव ढमढेरे येथे समोरून आलेल्या एम एच २० जी एन ९२३३ या दुचाकीची धडक बसून अपघात झाला, सदर अपघातात चंद्रसिंग गायकवाड व अनिल हिरवे हे दोघे गंभीर जखमी झाले असता दोघांवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र यउपचारा दरम्यान अनिल विश्वनाथ गायकवाड हिरवे वय ३१ वर्षे रा. धायरकर वस्ती तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांचा मृत्यू झाला असून याबाबत चंद्रसिंग खंडू गायकवाड वय २५ वर्षे रा. विठ्ठलवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच २० जी एन ९२३३ या दुचाकी वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील व राजेश माने हे करत आहे.