हॉटेल सावली बार मधून तब्बल ९१६ दारुच्या बाटल्यांची चोरी
( प्रतिनिधी ) सरदवाडी ता. शिरुर येथील हॉटेल सावली रेस्टॉरंट बारच्या पाठीमागील बाजूची खिडकीची पूर्ण फ्रेम बाजूला काढून बार मधील तब्बल नऊशे सोळा दारुच्या बाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरदवाडी ता. शिरुर येथे गौरव ओमनवार यांचे हॉटेल सावली रेस्टॉरंट बार असून रात्रीच्या सुमारास सदर हॉटेल बंद करुन सर्व कामगार घरी गेलेले होते, सकाळच्या सुमारास हॉटेल उघडले असता हॉटेल मधील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आल्याने कामगारांनी याबाबतची माहिती गौरव ओमनवार यांना दिल्याने त्यांनी हॉटेल मध्ये येऊन पाहणी केली असता हॉटेलच्या पाठीमागील बाजूची खिडकी पूर्णपणे बाजूला काढून ठेवल्याचे आणि हॉटेल मधील सर्व देशी विदेशी वेगवेगळ्या प्रकारची दारु चोरीला गेल्याचे दिसून आल्याने हॉटेल मध्ये पाहणी केली असता चोरट्यांनी खिडकीची पूर्ण फ्रेम बाजूला काढून ठेवून हॉटेल मधील देशी विदेशी वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल पावणे दोन लाख रुपये किमतीच्या नऊशे सोळा दारुच्या बाटल्यांची चोरी केल्याचे समोर आले, याबाबत गौरव सत्यप्रेम ओमनवार वय ३८ वर्षे रा. वाडा वसाहत कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी हे करत आहे.