( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर दुचाकीहून चाललेल्या दोघा युवकांना ट्रॅव्ह्ल्स बसची धडक बसून झालेल्या अपघातात स्वरूप तारिणी समान्ता या युवकाचा मृत्यू होऊन प्रशांतकुमार ब्रजमोहन बेहरा हा गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कृष्णा माधवराव पट्टेवाड या ट्रॅव्ह्ल्स बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून स्वरूप समान्ता व प्रशांत बेहरा हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ आर यु २५७४ या दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच ४० वाय ६९०२ या ट्रॅव्ह्ल्स बसची दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात होऊन अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले, दरम्यान नागरिकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वी स्वरूप तारिणी समान्ता वय ३५ वर्षे सध्या रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. ताकीपूर निमडांगी ता. पुरशा जि. हुगली पच्छिम बंगाल या या युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर प्रशांतकुमार ब्रज मोहन बेहरा वय ३५ वर्षे सध्या रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. ओरिसा हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले असून याबाबत दत्तात्रय महादेव निळूगडे वय ३१ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. साजूर ता. कराड जि. सातारा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कृष्णा माधवराव पट्टेवाड वय ४० वर्षे रा. वजूर ता. पूर्णा जि. परभणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.
सोबत - स्वरूप समान्ताचा फोटो.