दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना गोरगरीबांची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी तब्बल पन्नास वर्षाहून अधिक काळ या कुटुंबांना मिठाई वाटप करण्याची परंपरा धारीवाल कुटुंबांनी आजही अबाधित सुरु ठेवली आहे.
शिरुर शहरातील अनेक गोरगरीब कुटुबांना दिवाळीनिमीत्त तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटपाची सुरुवात उद्योगपती (स्व) रसिकलाल धारीवाल यांनी शहरात सुरु केली होती. शहरातील तब्बल 2000 कुटुंबांना मिठाई वाटप करुन आपली दिवाळी साजरी करायची असा त्यामागचा उद्देश होता. तीच परंपरा आज त्यांचे सुपुत्र उद्योजक प्रकाश धारीवाल व तिसरी पिढीतील युवा उद्योजक आदित्य धारीवाल यांनी सुरु ठेवली आहे.
शिरुर शहरातील सिद्धार्थनगर, सय्यदनगर, इंदिरानगर, बीसी हौंसिंग सोसायटी, शांतीनगर अशा परिसरात स्वत: जाऊन मिठाईच्या पुड्यांचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी प्रकाश धारीवाल यांच्यासह आदित्य धारीवाल, शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, जाकीरखान पठाण, संजय देशमुख, मुज्जफर कुरेशी, मनसुख गुगळे, संतोष शितोळे, प्रशांत शिंदे, प्रवीण दसगुडे, अभिजीत पाचर्णे, निलेश लटांबळे, रंजन झांबरे, निलेश जाधव, सचिन धाडीवाल, किरण पठारे, सागर नरवडे, वसिम सय्यद, एजाज बागवान, निलेश कोळपकर, शरद कालेवार, विनोद धाडीवाल, राजेंद्र लोळगे, निलेश पवार, सुशांत कुटे, अमजद पठाण, विशाल जोगदंड आदी उपस्थित होते
दिवाळीनिमित्त गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना देखील मिठाईचा आनंद मिळावा यासाठी अनेक वर्ष हा उपक्रम सुरु आहे. गोरगरीबांचे आशिर्वाद धारीवाल कुटुंबाच्या नेहमी पाठिशी असतात. त्यांच्या प्रेमाची कधी उतराई होऊ शकत नाही.
– प्रकाशभाऊ धारीवाल, उद्योजक.