विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळू अगर ना मिळू तमाम मतदार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर अपक्ष म्हणून उभा राहणारा पुणे जिल्ह्यात एकच फकडा पहिलवान होता त्याचं नाव होतं स्वर्गीय बाबुराव पाचर्णे हे नाव शिरूर हवेली नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या इतिहासात कायम लक्षात राहणार यात शंका नाही.
याच धर्तीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद शिरूर विधानसभा मतदारसंघात आव्हान देणार का?
शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ४ नोव्हेंबर शेवटचा दिवस असून, किती जाणे या दिवशी माघारी घेतील त्यात भारतीय जनता पार्टीचे बंडखोर प्रदीप कंद व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर शांताराम कटके हे दोघे उमेदवारी मागे घेतात का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघाची लढत ही दुरंगी होईल यात शंका नाही परंतु ही लढत तिरंगी ही होऊ शकते त्यासाठी प्रदीप कंद किंवा शांताराम कटके यांचा उमेदवारी अर्ज राहणे महत्त्वाचे आहे.
तर त्यात आज पुणे जिल्ह्यातील बंडखोरांना थंड करण्यासाठी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर येत आहे यामध्ये काही वाटाघाटी काही आश्वासने दिल्यानंतर प्रदीप कंद उमेदवारी अर्ज मागे घेतील का ? हे पाहणे गरजेचे आहे.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये प्रदीप कंद यांना उमेदवारीने हुलकावणी दिली आहे यंदाही अशाच प्रकारे हुलकावणी दिली असून, राजकारणात गचकरण झाले आहे आणि त्याचा तोटा प्रदीप कंद यांना झाला आहे. परंतु पुढील काळात राजकीय अस्तित्व जर टिकवायचे असेल तर प्रदीप कंद यांनाही निवडणूक लढवणे अत्यंत गरजेचे आहे कारण पुढील वर्षी हा मतदार संघ वेगळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यासाठी प्रदीप कंद यांनी ज्यांच्या बोटाला धरून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचा कित्ता गिरवणे गरजेचे आहे कारण बाबुराव पाचर्णे म्हणजे स्वकर्तुत्व ,नेतृत्व, आणि स्वतःची एक कार्यकर्त्यांची नेत्यांची फळी करणारा मातब्बर नेता म्हणून शिरूर हवेलीत नव्हे तर पुणे जिल्ह्यत यांचे नाव राहणार आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो पाचर्णे यांच्याकडे कायमच आदराने बघत होता. तीस वर्ष संघर्ष करत झगडत त्यांनी राजकारण केलं अनेक वेळा अपक्ष उभे राहण्याची वेळ आली परंतु नडगमगता कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या अमापप्रेमामुळे ते कधी डगमगले नाही.
अशा स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचा आदर्श घेऊन जर प्रदीप कंद यांनी निवडणूक रिंगणात उडी मारली तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभे राहतील यात शंका नाही. त्यांना मानणारा व प्रेम करणारा वर्गही मोठ्या प्रमाणात शिरूर हवेली तालुक्यामध्ये आहे. तोही त्यांच्या पाठीमागे उभा राहील परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे ही गरजेचे आहे नियोजनाशिवाय व जिवाभावाची कार्यकर्त्यांबरोबर आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात जुळवावे लागेल.
प्रदीप कंद यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त उमेदवारी अर्ज भरला आहे ४ नोव्हेंबरला उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आणि या तारखेवर कंद काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शिरूर हवेली च लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेऊन कंद राजकारणातून बंद होतात का ? उमेदवारी अर्ज कायम ठेवून माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे सारखा फकड्या पहिलवान होणार व राजकारण्यांची तोंड बंद करतात हे आपल्याला ४ नोव्हेंबरला समजेल......