आगीमध्ये दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान सुदैवाने हाणी नाही
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात एका दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या प्लास्टिक पाईपच्या गठ्ठ्याला अचानकपणे आग लागून दोन दुकानांना आगीने वेढा घातल्याने दोन्ही दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले असताना सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नसून नागरिकांना आग विझवण्यात यश आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात रक्षक हॉस्पिटल समोर एका मशिनरी स्टोअर्स दुकानाबाहेर असलेल्या प्लास्टिक पाईपच्या गठ्ठ्याला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागून आग सदर दुकानासह शेजारी असलेल्या काका पुतण्या चहा दुकानात आग शिरली, यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असताना डॉ. अविनाश रुके यांनी आग विझवण्याचे गॅस सिलेंडर तर नाना गिलबिले यांनी पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दिल्याने डॉ. रवींद्र टेमगिरे, शिवाजी होळकर, पोलीस शिपाई नारायण सानप, मनोज टेमगिरे यांसह आदींनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले असता काही वेळाने आग विझवण्यात यश आले, सदर आगीमध्ये दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही तर सदर आग फटाक्यामुळे लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे लागलेली भीषण आग.