शिक्रापुरात जुगार खेळणाऱ्या तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल
तळेगाव ढमढेरेत आठवडाभरात जुगारावर दुसरी कारवाई
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे दोन दिवसांपूर्वी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केलेली असताना पुन्हा येथील एका गोठ्याच्या आडोशाला पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करत जुगार खेळणाऱ्या तब्बल पंधरा जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील काटेआळी मध्ये एका गोठ्याच्या आडोशाला काही नागरिक पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली त्यांनतर पोलीस हवलदार अमोल चव्हाण, आत्माराम तळोले, लहानू बांगर पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी तळेगाव ढमढेरे गावामध्ये जाऊन एका गोठ्याच्या आडोशाला जाऊन छापा टाकला असता त्यांना काही इसम पत्त्यांवर पैसे ठेवून जुगार खेळत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांना जागेवर पकडत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली, याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी नागेश बाळासाहेब कोळपकर वय ४० वर्षे, संपत गोपाळ नरके वय ४९ वर्षे, किरण तुकाराम नरके वय ५० वर्षे, दत्तात्रय शिवाजी गायकवाड वय ६५ वर्षे, बाळासाहेब एकनाथ गायकवाड वय ६३ वर्षे, उत्तम गोविंद गायकवाड वय ५९ वर्षे, विजय महादू भुजबळ वय ४८ वर्षे, दशरथ विकास जाधव वय ४० वर्षे, सर्व रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे राजा लक्ष्मण पाटील वय ७२ वर्षे, राहुल संतोष वायकर वय २८ वर्षे, सतीश गणेश साळवे वय ३८ वर्षे सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, ज्ञानेश्वर पंढरीनाथ दरेकर वय ४२ वर्षे, सुधीर संभाजी दरेकर वय ३६ वर्षे, रंगनाथ बाबुराव दरेकर वय ५९ वर्षे, सुरेश विष्णू दरेकर वय ५० वर्षे सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.