शिरुर शहरात अल्पवयीन मुले- मुली लपाछपी खेळत असताना अल्पवयीन मुलगी एका घराच्या मागे लपलेली असता तेथे आलेल्या प्रणव जाधव याने तिला पकडून युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत युवतीचा विनयभंग केला.
घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने आपल्या आई-वडिलांना सांगत याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रणव जालिंदर जाधव (रा. कैकाडी आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेडगे करीत आहे.